आजचा बळीराजा

हिरवे हिरवे गार गालिचे
काळ्या मातीत फुलविलेले ;
सुंदर स्वप्न अन्  इच्छा मोठ्या
बियाण्यांन सोबत रुजविलेले :

कष्टकरी ” शेतकरी “
” राजा ”  म्हणवून घ्यायचा ज्या देशात ;
दबून गुदमरतोय , तीळ तीळ संपतोय
निसर्ग , आपत्ती , सरकार आणि योजनांच्या क्लेशात:

कधी रवी , नारायण
उगाचच फुगतो , नी तापून जाळतो ;
तर कधी वरुण , राजा तो
नुसताच बरसून , फक्त हाहाकार माजवितो :

अश्यातच…उन्हाळी , खरीप , रब्बी ही जातो
हंगाम मग आता फक्त , शिंग्याचाच उरतो ;
अख्या जगाच्या ताटात , भाकर पुरवणारा
आपण मात्र , खाऱ्या पाण्याच्या घोटावरच झोपी जातो :

उजाडल्यावर एके दिवशी , घरी
सुटा बुटातला साहेबच येतो…… !!!!
अरबनयाझेशन , कॅपीटलायझेशन च्या नावा खाली
पोटच्या पोरासारख्या आमच्या जमिनींचाच सौदा करतो….???!

ऐकून काळजाचा ठोका चुकतो खरा…….
पण मग डोळ्यासमोर मुलांचं शिक्षण अन् बेभरवशी निसर्गाचा खेळ दिसतो ;
सोपवून तुकडा त्यांच्या हवाली मग
आम्हीही , खोट्या आनंदाचा आव आणतो : !!

बाजारात रोज, मालाचा दर
चढुन उतरतो , नि उतरून चढतो ;
घाम गाळून आम्ही पिकवतो
नि भाव दूसाराच ठरऊन जातो :

बचत , शिल्लक नसतेच कधी खात्यात आमच्या
रोकड हाती , तीही व्याजावर आणलेली ;
डोक्यावर सतत टांगती तलवार
घेतलेली रक्कम परतवायची कशी ?

मग , अचानक एका विचाराने
डोक्यातली घंटा वाजते ;
हाफत्याच्या रकमेपेक्षा तेव्हा
जीवाची किंमत , जास्त स्वस्त वाटते :

एकच माफक अपेक्षा
या अल्पशिक्षित राजाची असते ;
सेवेसाठीच असलेल्यांनी आमच्या
भाकरीची दलाली करायची नसते :

गाऱ्हाणं आमचं माऊली जवळ
निर्विघ्न पणे पोहचू दे ;
माझी वसुंधरा पुन्हा
सुजलाम सुफलाम होऊ दे :

बळ न संपता
कोणाचंही या मातीत ;
माझा बळी , पुन्हा एकदा
राजा म्हणून उभारू दे!


राजा म्हणून उभारू दे!!!!!!!!!!!!

#बळीराजा

#dedicatedtoallhardworkingfarmers

One thought on “आजचा बळीराजा

Leave a comment